प्रशिक्षक

आम्ही आपल्याला आश्चर्यचकित करणार आहोत. आपण विचार करत असाल कि आपण संडे स्कूल शिक्षक बनण्यासाठी साइन अप केले होते पण, आपण आता एक प्रशिक्षक आहात! ते बरोबर आहे, या वर्षी आपण एका बॉक्सिंग थीम सह बायबलचा अभ्यास करणार आहोत आणि आपल्याला खेळासोबत मजा येईल अशी आशा करतो. प्रिय शिक्षक, लगेच सुरुवात करा! शिक्षकाऐवजी एक प्रशिक्षक बना, आणि तुम्ही तुमच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीची सखोल काळजी घेऊ शकता, आणि चॅम्पियन बनण्यासाठी त्यांची प्रगती व प्रयत्नांची पराकाष्ठा पाहू शकता.

लहान गट

3-7 मुलांचे लहान गट तयार करा. प्रत्येक लहान गटाला एका प्रशिक्षकाची गरज असते. प्रत्येक आठवड्यात वर्गात उपस्थित राहण्याची गरज नाही, पण तुमच्या विद्यार्थी किंवा " खेळाडूं " वर प्रत्येक आठवड्यात लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या एका विशेष नेत्याची मुख्य प्रषिक्षक म्हणून नेमणुक करा, सर्व प्रशिक्षकांना आयोजित करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी.

आपल्या वर्गातील मुलांचे लहान गटांमध्ये विभाजन करा म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात आठवड्यातील असाइनमेंट करण्यास मदत होईल. बहुतेक संडे स्कूल कार्यक्रम चर्चमध्ये असतात, आणि त्यासाठी आठवडाभर गृहपाठ करण्याची आवश्यकता नाही. पण तुमचे विद्यार्थी फ़क्त शिक्षण घेऊन त्यांच्या आयुष्यातील पापांना “नॉक आउट” करू शकत नाहीत. त्यांना प्रत्यक्षात “इन द रिंग” यावे लागेल आणि आठवडाभरातल्या पापांशी लढावे लागेल. खरोखरच, त्यांच्यावर कोणी लक्ष नाही ठेवले तर हे करणे अशक्य आहे. कृपया त्यांच्या “वचनांवर विश्वास” ठेवू नका आणि त्यांनी असाइनमेंट केली असे म्हटल्यावर ते स्विकारू नका. आपण या प्रोग्राम बद्दल शिथील झालात तर, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दयाल. पण असा विचार करा की तुम्ही खरच जर तुमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि ते गृहपाठ करत आहेत हे ट्रॅक करत राहिलात तर तुम्हाला त्यांच्या जीवनात खरा बदल दिसेल. फक्त 1 वर्षात, तुम्ही त्यांच्या जीवनात बदल घडवू शकता! तुमचे विद्यार्थी फ़क्त "फ्रूट ऑफ़ द स्पिरिट" पाठ करणार नाहीत तर ते खरोखर ते जगतील!

अशा लहान गटांना मदत करण्यासाठी, आम्ही आपल्या साठी प्रशिक्षक हँडआउट तयार केले आहे आणि तुमच्या मुख्य प्रशिक्षकांसाठी एक लहान पुस्तक. शिक्षकांचे हँडआउट प्रत्येक महिन्यासाठी आणि प्रत्येक फ्रूट ऑफ़ द स्पिरिटसाठी आहेत. मुख्य प्रशिक्षकांकड़े एक लहान पुस्तक आहे ज्यात पूर्ण 3 महिन्यांच्या असाइनमेंट्स आहेत.

प्रशिक्षक हँडआउट्स 1
प्रशिक्षक हँडआउट्स 1

Only available as a download.

हे प्रत्येक महिन्यात सर्व प्रशिक्षकांना दया. युनिट 1: प्रेम, आनंद, आणि शांती

प्रशिक्षकांची जबाबदारी

प्रशिक्षक

  • 3 - 5 मुलांना प्रशिक्षित करा.
  • असाइनमेंटवर चर्चा करण्याकरिता आणि मुलांना चॅम्पियन बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता प्रत्येक आठवड्यातील वर्गा आधी आणि नंतर मुलांना 5 मिनट भेटा.
  • विद्यार्थ्यांना असाइनमेंटची आठवण करून देण्याकरिता दर आठवड्याला कॉल/ मेसेज करा. (मुख्यतः = मंगळवारी)
  • असाइनमेंटचा आढावा घेण्याकरिता विद्यार्थ्यांना दर आठवड्याला दुसऱ्यांदा कॉल/ मेसेज करा. (मुख्यतः = शुक्रवारी)
  • लहान गटांतील मुलांनी केलेल्या असाइनमेंट्स चा मागोवा ठेवा आणि मुख्य प्रशिक्षकांना साप्ताहिक अहवाल द्या.

मुख्य प्रशिक्षक:

  • असाइनमेंटवर चर्चा करण्याकरिता आणि प्रशिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना विश्वसनीय प्रशिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता प्रत्येक आठवड्यातील वर्गा आधी आणि नंतर प्रशिक्षकांना 5 मिनट भेटा.
  • प्रशिक्षकांना असाइनमेंटची आठवण करून देण्याकरिता दर आठवड्याला कॉल/ मेसेज करा. (मुख्यतः = मंगळवारी)
  • असाइनमेंटचा आढावा घेण्याकरिता प्रशिक्षकांना दर आठवड्याला दुसऱ्यांदा कॉल/ मेसेज करा. (मुख्यतः = शुक्रवारी)
  • सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या असाइनमेंटचा मागोवा ठेवा.
  • दर महिन्याला प्रशिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रेरणादायी संमेलने भरवा.

भरती

अधिक नेत्यांची भरती करणे जेणेकरून तुम्हाला लहान गटांसाठी पुरेसे प्रशिक्षक असतील ,आव्हानासारखे वाटेल. पण हे कठीण नाहीये. येथे काही कल्पना आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रशिक्षक शोधणे सोपे जाईल:

  • प्रशिक्षकांना फक्त 1 महिन्यासाठी सेवा करायला सांगा. प्रत्येक महिन्यात एक फ्रूट ऑफ़ द स्पिरिट कव्हर केले जाईल. प्रौढांना त्यांच्या बांधिलकीबद्दल विचारताना, तुम्ही 1 महिन्यासाठी विचारलत तर जास्त जणं साइन अप करतील. पहिल्या महिन्यानंतर, तुम्ही ते सोपे आणि मज़ेदार केले तर ते परत साइन अप करतील!
  • प्रशिक्षकांना सामान्यपणे चर्चमधे उपस्थित राहू द्या, पण त्यांच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी 10 मिनिटे लवकर चर्चमधे यायला सांगा. तुमचे प्रशिक्षक तुमच्या संडे स्कूल वर्गात महिन्याभरात फ़क्त एकदाच उपस्थित राहू शकतात, आणि बाकी आठवड्यात चर्च मधे सामान्यपणे उपस्थित राहू शकतात.
  • विद्यार्थ्यांना कॉल करण्याऐवजी मेसेज करा. तुमच्या प्रशिक्षकांना महिनाभर स्वयंचलित मेसेज सेट करण्यासाठी मदत करा, म्हणजे ते सहजरित्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहू शकतात. हे विसरू नका की पारंपारिक कॉलिंग करण्यापेक्षा तुम्ही फेसबुक, ट्विटर किंवा व्हाट्सएप्प एकाउंट्स इ. वापरू शकता.
  • प्रशिक्षकांना काही गोष्टी संचयित करण्यासाठी चर्च येथे एक स्थान निर्माण करा. “स्पोर्टी” दिसण्याकरिता तुमचे प्रशिक्षक एक स्पोर्ट्स कॅप किंवा शिट्ट्या आणि पाण्याच्या बाटल्या वापरू शकतात. दर आठवड्याला त्या गोष्टी आणण्याची आठवण ठेवण्यापेक्षा त्यांना त्या गोष्टी चर्च मधेच ठेवू द्याव्या. या प्रकारे तुमचे प्रशिक्षक नेहमीचे चर्चचे कपडे घालून येऊ शकतात, आणि प्रशिक्षकांसारखे दिसण्याकरिता वरून काही फ़क्त "स्पोर्ट्स" च्या गोष्टी घालू शकतात.
  • प्रशिक्षकांसाठी मासिक बैठक अधिक प्रेरणादायी बनवा, जेणेकरून त्यांना वर्षभर कार्यक्रमात सहभाग घेण्याची इच्छा होईल.
  • आवश्यक असल्यास मोठ्या गटांना अनुमती द्या. (फेसबुक वरील ग्रुप नोटिफिकेशन्स च्या सहाय्याने, 10 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे तितके अवघड जाणार नाही.)

प्रेरणादायी बैठक

मुख्य प्रशिक्षकाचे महत्वाचे काम म्हणजे प्रशिक्षकांना प्रोत्साहित करणे. हे करण्यासाठी एक महत्वाचा मार्ग आहे मासिक प्रेरणादायी बैठक घेणे. तुम्ही जेवण देऊ शकता, एकत्र प्रार्थना करू शकता, क्रीडा डेटा पाहू शकता आणि ते आपल्या ख्रिस्ती जीवनात कसे लागू करू शकतो हे पाहू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही ऑलिम्पिक खेळाडू पाहू शकता किंवा पॉपकॉर्न व इतर स्वादिष्ट पदार्थांसोबत एकत्र एक प्रेरणादायी क्रीडा चित्रपट पाहू शकता. तुमच्या प्रशिक्षकांसोबत चर्चा करा की ह्या खेळाडूंनी अजून कष्ट घ्यायला हवे होते का, मग आपल्याला पण आध्यात्मिक आणि चिरंतन लाभासाठी अजून काम करायला का?