आढावा

आपण फ्रूट ऑफ़ द स्पिरिटचा अभ्यास करणार आहोत. मात्र, केवळ फ्रूट(फळ) न बघता, शरीराचे अनेक पाप सुद्धा जे आपल्या फ्रूट ऑफ़ द स्पिरिट विरुद्ध लढतात. आपले ध्येय आपल्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन्स होण्यास मदत करणे आहे. हे करण्यासाठी, त्यांनी फक्त स्मृती अध्याय लक्षात ठेवणे आणि बायबल कथा पाठ करणे आवश्यक नाही तर, त्यांच्या दैनंदिन जीवनातील कृतीमध्ये देखील फ्रूट ऑफ़ द स्पिरिट लागू करणे आवश्यक आहे.

"पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही." गलाशियन्स 5:22-23

युनिट 1

धडा 1

प्रेम विरुद्ध स्वार्थ
बायबलमधील कथा: येशू क्रूसावर मरण पावला
मॅथ्यू 27:27-56

स्मरण काव्य

"अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वत:चा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे." 1 जॉन 3:16

इन द रिंग

तुमचे मित्र सुचवातील तो खेळ खेळा, त्यांना पाहिजे त्या वेळी खेळा (तुम्हाला परवानगी असल्यास) आणि त्यांना पाहिजे तो पर्यंत खेळा. तुम्हाला काय खेळायची इच्छा आहे हे त्यांना सांगू नका. या वेळी तुमच्या इच्छा महत्वाच्या नाहीत, कारण तुम्ही स्वतःचा विचार न करता खरे प्रेम दर्शवत आहात.

धडा 2

प्रेम विरुद्ध निर्णयी वृत्ती
बायबलमधील कथा: धूळीचा कण आणि फळी
मॅथ्यू 7:1-5

स्मरण काव्य

““यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे." मॅथ्यू 7:1-2

इन द रिंग

कोणाला तरी "चांगले काम" असे सांगा आणि काहीतरी चांगले काम केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. पूर्ण दिवस तुमच्या सोबत एक लहान खिश्यातील आरसा ठेवा. जेव्हा तुम्हाला कोणाचीतरी निंदा करण्याचा मोह होतो तेव्हा, खिश्यातील आरसा बाहेर काढून स्वतःला त्यात पहा. स्वतःला आठवण करून द्या की तुम्हाला इतरांच्या दोषांचे निराकरण करण्यास मदत करण्याची गरज नाही.

धडा 3

द्वेष विरुद्ध प्रेम
बायबलमधील कथा: यहूदा येशूचा विश्वासघात करतो
मॅथ्यू 26:14-16

स्मरण काव्य

"जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,” पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही!" 1 जॉन 4:20

इन द रिंग

तुम्हाला आवडत नसणाऱ्या कोणासाठी तरी काहीतरी छान करा. कोणी दुसऱ्याची फसवणूक करत असेल किंवा घालत असेल तर तुम्ही ज़रा जपून बोला. तुम्ही त्यांना सांगू नका किंवा त्यांना कुठल्या समस्येत पाडू नका.

धडा 4

प्रेम विरुद्ध स्वत:चे समर्थन
बायबलमधील कथा: बोधकथा चांगले शोमरोनी
लूक 10:25-37

स्मरण काव्य

“तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.” व “स्वत:वर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’ “ ” लूक 10:27

इन द रिंग

या आठवड्यात गरज असणाऱ्या कोणालातरी मदत करण्यासाठी थांबा, न करण्याच्या सर्व कारणांकडे दुर्लक्ष करून. समाजात तुमच्या स्तरावर नसणाऱ्या कोणासाठीतरी काहीतरी विशेष करा.

धडा 5

प्रेम विरुद्ध आध्यात्मिक निरर्थकता
बायबलमधील कथा: दावीदची राजा म्हणून निवड
1 शमुवेल 16:1-13

स्मरण काव्य

"तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही. प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही. ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते" 1 करिंथकरांस 13:4-7

इन द रिंग

जसजसे तुम्ही प्रेमावर तुमचे लक्ष केंद्रित करता , देवाला विचारा की असा कोणता आध्यात्मिक सराव आहे का जो तुम्ही बंद केला पाहिजे. या आठवड्यात प्रेम व्यक्त होईल अशा अधिक क्रिया करा: फुशारकी मारू नका, स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जे सर्वोत्ताम आहे ते करा, आणि लोकांनी केलेल्या चुकांसाठी त्यांना जबाबदार धरू नका.

धडा 6

आनंद विरुद्ध हेवा
बायबलमधील कथा: धार्मिक नेते एकमेकांचा हेवा करतात
कृत्ये 5:12-33

स्मरण काव्य

" कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय?" 1 करिंथकरांस 3:3

इन द रिंग

आध्यात्मिक भेटी, शारीरिक स्वरूप, मालमत्ता, आणि तुम्हाला मिळालेल्या कुटुंबासाठी देवाचे आभार माना. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाला आनंद आणि समाधान देण्यास सांगा. पूर्वी हेवा वाटत असलेल्या कोणालातरी निवडा, आणि त्यांना एक लहान भेट द्या. (तुमच्या पूर्वीच्या हेव्याबद्दल त्यांना सांगू नका.)

धडा 7

आनंद विरुद्ध लोभ
बायबलमधील कथा: श्रीमंत तरुण
मॅथ्यू 19:16-30

स्मरण काव्य

“मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वत:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.””
लूक 12:15

इन द रिंग

तुमच्या स्वत:च्या वैयक्तिक पैशातील काही पैसे चर्च येथील अर्पण प्लेट मध्ये देवाला द्या, ते कोणासाठी जातील हे माहीत नसताना. स्वत:च्या वैयक्तिक पैशातील काही पैसे कोणाचीतरी सेवा करण्यासाठी वापरा. If तुमच्या जवळ पैसे नसतील तर जे आहे ते देऊन टाका.

धडा 8

आनंद विरुद्ध स्वत:ची दया
बायबलमधील कथा: जोनाह आणि किड़ा
जोनाह 4:1-10

स्मरण काव्य

"कारण आमची हलकी व क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे. म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे." 2 करिंथकरांस 4:17-18

इन द रिंग

बेघर निवारा किंवा गरिबांना खायला देणाऱ्या सेवा सदनात मदत करा. किंवा, रुग्णालयात आजारी लोकांना भेट द्या. प्रार्थना करा आणि देवाला तुम्हाला मोठे चित्र दाखविण्यास सांगा, आणि स्वतःवरील लक्ष कमी करण्यास मदत करायला सांगा.

धडा 9

आनंद विरुद्ध कृतघ्नपणा
बायबलमधील कथा: येशू 10 कुष्ठरोग्यांना बरे करतो
लूक 17:11-19

स्मरण काव्य

"त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा." स्तोत्र 100:4

इन द रिंग

तुमच्या पालकांचे (किंवा दुसऱ्या कोणाचे तरी) आभार माना, ते तुम्हाला रोज जे देतात त्याबद्दल. तुम्ही थोडयावेळासाठी ज्याच्या शिवाय राहू शकता अशी एखादी वस्तू निवडा, याची आठवण करून देण्यासाठी की तुम्हाला नेहमीच ते मिळणार नाहीये.

धडा 10

शांति विरुद्ध काळजी
बायबलमधील कथा: कावळ्यांनी एलीयाला खायला दिले
1 राजे 17:1-6

स्मरण काव्य

"तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील."
मॅथ्यू 6:33

इन द रिंग

तुमच्याजवळील एखादी वस्तू दुसऱ्यासोबत शेअर करा, त्यामुळे तुम्हाला त्याच्याशिवाय जावे लागले तरी. एकतर अन्न, वस्त्र, बस भाडे, किंवा जिथे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात असे काहीतरी. देवाला तुमच्या गरजा पूर्ण करायला सांगा.

धडा 11

शांति विरुद्ध भीती
बायबलमधील कथा: पीटर पाण्यावर चालतो
मॅथ्यू 14:22-33

स्मरण काव्य

"तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”” मॅथ्यू 17:20-21

इन द रिंग

असे काहीतरी करायला निवडा की जे करणे अशक्य वाटते, आणि तुमचे भय दूर करा. प्रभु येशूला हे करण्यास मदत मागा. मग त्यासाठी पाऊल पुढे टाका. (प्रारंभ करणे यश आहे, हे तुमच्यासाठी जरी तुमहि पीटर सारखे बुडालात तरी. कार्य असे आहे की अशक्य वाटणारे काहीतरी निवडणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे.)

धडा 12

शांति विरुद्ध मतभेद
बायबलमधील कथा: दुसरा पण गाल पुढे करा
मॅथ्यू 5:38-42

स्मरण काव्य

"शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा." रोम 12:18

इन द रिंग

या आठवड्यात एकदा स्वत:वर अन्याय करण्याची परवानगी द्या. (ते बहुधा स्वत: होईल.) तुमची असाइनमेंट आहे की तुम्ही काहीही करु नका.

धडा 13

शांती विरुद्ध स्वत:चा विश्वास
बायबलमधील कथा: येशू 5000 ना खावयास देतो
लूक 9:10-17

स्मरण काव्य

"पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे." 2 करिंथकरांस 12:9

इन द रिंग

देवाला त्याची सेवा करण्याची संधी मागा, तुम्ही ज्या क्षेत्रात दुर्बल आहात तेथे. त्या क्षेत्रात सेवा देण्याकरिता तुमच्या चर्चमधे साइन अप करा. तुम्ही शांत असाल, तर या आठवड्यात जास्त बोला. तुम्ही खूप बोलके असाल तर या आठवड्यात शांत रहा.

 

युनिट 2 आणि 3 लवकरच येत आहे!