योजना

“गुप्त हेर : देवाच्या राज्याचा षोध करणारे” हया पाठय्क्रमामध्ये तुम्हाला तुमचा वर्ग यषस्वी करण्यासाठी साहित्य मिळेल.योजना

1. षिक्षकांकरिता

मुख्य पाठ व वर्गाला केंद्रित करण्यासाठी कल्पना व विचार आहेत.

2. खेळ

अभ्यासातून समोर आले आहे कि जगभर 90 टक्के मुले वर्गात कंटाळलेले असतात. तुमच्या विद्यार्थ्यांना कंटाळलेले नव्हे तर कार्यक्षम ठेवण्यासाठी खेळांचा उपयोग करा. खेळांचा वापर करून तुम्ही मुलांना चालते फिरते ठेवून मुख्य मुद्यावर क्रेंद्रित करू षकता.

3. दृक्‌साधनं

दर आठवडी तुम्ही घरून आणलेली एखादी वस्तू पाठाचा परिचय करण्यासाठी किंवा चित्तवेधक वातावरण निर्माण करण्यासाठी वापरा.

4. प्रष्न

मोठया विद्यार्थ्यासाठी हे प्रष्न आहेत जेणेकरून त्यांना दाखल्यांचा अर्थ समजला कि नाही हे आपल्याला कळेल.

5. उत्तरे

विद्यार्थी पुस्तीकेतील स्वध्यायाची उत्तरे पानावरील उजव्या बाजूस मिळतील.

विद्यार्थी पुस्तक

विद्यार्थी पुस्तिका विद्याथ्यांना एकचित्त करण्यासाठी व वर्ग मनोरंजक करण्यासाठी षिक्षकांचे साधन आहे.

हया पुस्तकांत खालिल स्वाध्यायाचा समावेष आहेः

  • षास्त्रपाठ- आम्ही पुस्तकांमध्ये पवित्र षास्त्रातील उता-यांचा समावेष केला आहे जो तुम्ही सहज वर्गात वाचू षकाल.
  • पाठांतर वचन
  • कोडी
  • गुप्त संदेष (मोठ्‌या विद्यार्थ्यांसाठी)- गुप्त संदेषाचा अर्थ लावण्याकरिता दिलेली कृती दर आठवडी करा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे कोडे सोडविण्यासाठी गुरूकिल्ली असावी.
  • मत्तयाच्या पुस्तकाचे वाचन (मोठ्‌या विद्यार्थ्यांसाठी)- तुमच्या विद्यार्थ्यानी पवित्र षास्त्र अधिक प्रामाणात वाचावे म्हणून हे अधिक कार्य आहे. मत्तयाचे पुस्तक दर आठवडी 2-3 आध्यायामध्ये विभागलेले आहे जर त्यांनी वाचन गृहपाठ केला तर 13 आठवडयात विद्यार्थी संपूर्ण मत्तयाचे पुस्तक वाचतील. तुमच्या विद्यार्थ्यांनी हया कार्यक्रमात यषस्वी व्हावे अषी तुमची इच्छा असल्यास षिक्षक हया नात्याने कार्यक्रमावर भर देणे ही तुमची जवाबदारी आहे.

गुप्त संदेष व गुरूकिल्ली

कठिन व प्रगत पुस्तक वापरणा-या विद्यार्थ्यांसाठी

विद्यार्थ्यासाठी दर आठवडी त्यादिवसाच्या पाठाला अनुरूप गुप्त संदेश असेल.गुरूकिल्ली पानावर अधिक माहिती पाहा.

कापा व चिकटवा

लहान विद्यार्थ्यासाठी

मुलांना चिकट चित्रे आवडतात! लहान विद्यार्थ्यासाठी आम्ही दर आठवडी हे कार्य दिलेले आहे, चित्र कापून पाठातील पानावर चिकटविणे. बिंदू रेशेच्या आत चित्र चिकटवून मुलांना रंग भरण्यास सांगा.

. डाउनलोड: स्टिकर (पिडिएफ, 1.8 एम बी )