उंटाचे साहस

‘उंटाचे साहस’ एक नविन आणि उत्साहपूर्ण सुट्टी शाळा कार्यक्रमात आपले स्वागत आहे! इस्त्राएल लोकांसारखे बंदीवास असतांना ह्या भ्रष्ट जगामध्ये धैर्याने देवाचे अनुसरण करणे शिकत असतांना तुमच्या मुलांना उंट व राजे ह्यांच्या बरोबर जंगली साहसात घेऊन जा. ह्या कार्यक्रमात आपण दानीएल व त्याचे मित्र शद्रख मेशख आणि अबेदनगो ह्यांच्या जीवनाचे अनुसरण करणार आहोत. धडा 4 मध्ये एस्तेर राणी तुमच्या सुट्टीतील पवित्र शास्त्र शाळेत पाहूणी म्हणून येणार आहे. ह्या सुट्टीतील पवित्र शास्त्र शाळेत मुलांना ख-या जीवनातील अधुनिक वळणासह मजेशीर उंट (पपेट किंवा अभिनेते) ह्यांना जाणून घेणे आवडेल. धडयाच्या शिर्षकाबरोबर जाणारी मजेशीर कृती मुलांना शिकवा आणि मुख्य धडयात व पूर्ण दिवसभर त्याची पुनरावृत्ती करा. साम्राज्यातील हस्तकृती ह्या स्थानकावर परवडणारे व सहजरित्या उपलब्ध होणारे व जगात कुठेही पर्याय मिळणारे साहित्याचा उपयोग करून मजेशीर हस्तकृती तयार करा. राजमहलात वर्ग ह्यात मुलं क्लिष्ट चक्रव्यूह आणि विविध कोडे सोडविण्याचा आनंद घेतील. मोठया मुलांना त्या धडयाशी संलग्न जीवनातील वास्तव समस्या ह्यांचा विचार करण्याची संधी मिळेल आणि प्रत्येकाला दररोज एक छोटे नेमून दिलेले काम मिळेल त्यांना धडा आचरणात आणण्याचा सराव करण्यासाठी. दानीएल व एस्तेर ह्यांना भेटणे आणि त्यांच्या कडुन थेट गोष्टी ऐकणे आणि नंतर दानीएल स्थानकावर नाटकामध्ये मनोरंज कार्य करणे मुलांना आवडेल. नक्कीच कुठलीही सुट्टीतील पवित्र शास्त्र शिक्षण शाळा ही खेळांशिवाय पूर्ण होणार नाही! बागेतील खेळ आणि राजेशाही मेजवानी स्थानकावर खेळ आणि ऐच्छिक फराळाच्या कल्पना पहा. अधिक कल्पना पाहण्यास विसरू नका जेणे करून तुमची सुट्टीतील पवित्र शास्त्र शिक्षण शाळेत अधिक सजावट करण्यासाठी व ती अधिक मजेशिर बनविण्यासाठी अधिक कल्पना प्राप्त होतील!