आमच्याविषयी

मुले महत्वपूर्ण आहेत भारतआम्ही कोण आहोत

Children, conferences and training, materialsमुले महत्वपूर्ण आहेत भारत (मुले महत्वपूर्ण आहेत) ही 2005 मध्ये स्थापन झालेली इंटर-डिनॉमिनेशनल पॅराचर्च संस्था आहे. आमचे लक्ष्य जगभरातील मुलांचे सेवाकार्य असून विशेष भर साहित्यसामुग्रीवर देण्यात आला आहे.

इतर संस्थांपेक्षा आमची संस्था दोन बाबतीत वेगळी आहे. पहिले म्हणजे आम्ही आपली सर्व सामुग्री ऑनलाईनवर डाऊनलोडसाठी विनामूल्य उपलब्ध केली आहे. आमची छापिल सामुग्री विक्रीकरिता उपलब्ध आहे, पण आम्ही फोटो प्रतिलिपी काढावयास मनाई करीत नाही. दुसरा फरक हा आहे की आम्ही तीच सामुग्री पुन्हा पुन्हा वापरत नाही, तर दरवर्षी नवीन सण्डेस्कूल और व्ही बी एस अभ्यासक्रम तयार करतो.

आमचे ठिकाण मेक्सिको शहराबाहेर एका तासाच्या अंतरावर आहे. मागील दहा वर्षे, आम्ही “Los Niños Cuentan” हया सेवासंस्थेच्या नावाने लॅटिन अमेरिकेसाठी स्पॅनिश भाषेत साहित्य सामुग्री तयार करीत आहोत. 2014 मध्ये, आम्ही आमच्या दर्शनात आणखी इंग्रजी भाषी जगाचा समावेश केला. 2015 मध्ये आम्ही आमचे साहित्य पोर्तुगीज, हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्यालम, आणखी मराठी भाषेत भाषांतर करू लागलो. या वेळी आमच्या जवळ ऑन आणि ऑफ-साइट काम करणारे 20 कर्मचारी आहेत, ते कार्यालयात साहित्यनिर्मिती, भाषांतर, छपाई, आणि विक्री इत्यादी कामे करतात. आम्ही ख्रिस्तामधील भाऊबहिणींची टीम आहोत, आणि तुमच्या मदतीसाठी काम करीत आहोत.

आपण येथे जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आहात; आम्ही तुमची मदत करण्यासाठी आहोत!

संपर्क सूचना

Otumba, Mexico State (Near Mexico City)
Country code: (52)

592-924-9041
kristina@childrenareimportant.com

Our print shopआमचे सेवाकार्य

जगातील अनेक मंडळया पुढील पीढीस सुवार्ता सांगण्यासाठी पुरेश्या साधनसामुग्री वाचून कार्य करीत आहेत. वेबवरील आमचे सर्व साहित्य डाऊनलोडसाठी वापरण्यासाठी, फोटोप्रतीसाठी आणि वितरीत करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे। होय, तुम्ही बरोबर पाहिले - ते पूर्णपणे विनामूल्य आहे!

दरवर्षी आम्ही नवीन साहित्य लिहितो आणि तयार करतो अशाप्रकारे, उद्याची चिंता न करता आमच्याजवळ जे काही उपलब्ध आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. पुढील वर्षासाठी अगदी नवीन साहित्य उपलब्ध असेल! आम्ही सहज प्रिंट करता येईल असे मजेदार डिझाईन तयार करतो. तुम्हाला प्रत्येक आठवडयाचा पाठ डाऊनलोड करण्याची गरज नाही कारण प्रत्येक सण्डेस्कूलचा अभ्यासक्रम 13-आठवडयांच्या यूनिटमध्ये मांडलेला आहे. तुम्हाला तुमच्या वयोगटानुसार शिक्षकाचे पुस्तक आणि विद्यार्थ्याचे पुस्तक डाऊनलोड आणि प्रिंट करता येईल, आणि तुम्ही पुढील 3 महिन्यांच्या वर्गासाठी तयार असाल.

सध्या आमच्या वेबसाईटला दररोज भेट देणारे 1000 पेक्षा अधिक आगळेवेगळे व्हिजिटर्स आहेत, जे 28 वेगवेगळया देशांतून दररोज सरासरी 10 गिगाबाईट्स डाऊनलोड करतात. याचा अर्थ दररोज सरासरी 700 पुस्तके डाऊनलोड होतात! या संख्येनुसार, आमचा जवळ जवळ असा अंदाज आहे की मागील वर्षी 1.5 लाख मुले आमच्या व्ही बी एस आणि सण्डेस्कूल साहित्यामधून देवाविषयी शिकत होते.

गरज फार मोठी आहे आणि छपाई फार महाग आहे, म्हणून आमच्याजवळ येथे मेक्सिकोमध्ये छापखाना आहे. आम्ही स्पॅनिश भाषेत छापील पुस्तके विकतो. आम्ही येथे पैसे कमाविण्यासाठी नाही, तर पुढील पीढीस येशू ख्रिस्तासाठी जिंकावयास आहोत. सन् 2014 मध्ये आम्ही 13 वेगवेगळया डिनॉमिनेशन्सच्या 2500 मंडळयांस 150ए000 पेक्षा अधिक मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके छापली आणि जहाजाने पाठविली. आम्हास आशा आहे की आम्ही लवकरच भारतातही साहित्य छपाई करू.

आमच्या दर्शनाचा दुसरा भाग प्रशिक्षण, दृष्टांत, आणि शिक्षकांसाठी व्यवहार्य टीपा आहेत. आमचे कार्य समपर्ति शिक्षकांस प्रोत्साहन, प्रेरणा देणे, आणि सामुग्री पुरविणे आहे, त्यांस त्यांच्या सभोवतालच्या मुलांसाठी खऱ्या सेवेवर एकाग्रचित्त होण्याची मोकळीक देणे आहे. तुम्ही निराश न होता अनेक वर्षे टिकून राहावे म्हणून आम्ही तुमची मदत करू इच्छितो. सण्डेस्कूलमध्ये शिकवीत राहणे किंवा सकाळच्या न्याहारीचा कर्यक्रम चालविणे किंवा मुलांच्या सेवेसाठी आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी जरूरी पैसा उभारणे हे किती कठीण आहे हे आम्हास माहीत आहे. सोडून जाण्याचा विचार करणे सोपे आहे, पण मुलांच्या जीवनात काम करण्यात आणि फळे पाहण्यात आनंद आहे. आम्ही असे प्रोत्साहनदायक लेखांद्वारे, प्रशिक्षण व्हीडियो आणि सजीव कॉन्फ्रन्सेसद्वारे करतो. यावेळी आमचे सर्व प्रशिक्षणसाहित्य स्पॅनिश भाषेत आहे, पण आम्ही ते लवकरच भारतात तयार करू.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला येथे प्रोत्साहन आणि सामुग्री दोन्ही मिळतील. ChildrenAreImportant.com मध्ये आपले स्वागत आहे!