लोगो “गॅलेक्सी एक्सप्रेस”गॅलेक्सी एक्सप्रेस होम

गॅलेक्सी एक्सप्रेस व्ही बी एस कार्यक्रमात आपले स्वागत असो!

तुम्हास सुरूवात करण्यासाठी आणि तुमच्या मंडळीत आणि समाजात आठवडयाभराचा विशेष कार्यक्रम सुरू करण्यासाठी (उडाण भरण्यासाठी) सर्वकाही तयार आहे, ज्याद्वारे सर्वदासाठी अनेक लोकांच्या जीवनात बदल घडून येईल.

शिक्षकांस तुमच्या मंडळीतील अथवा क्लबमधील काही जागा “गॅलेक्सी एक्सप्रेस” नावाच्या अंतराळयानात बदलणे आवडेल, जेथे दररोज संपूर्ण गट देवाचे अद्‌भुत कार्य पाहण्यास बाहेरील अंतरिक्षात उडाण घेईल. अंतरिक्षयानात उडाण घेतांना धमाका होईल, आणि मुले अशी कल्पना करीत डावीकडे आणि उजवीकडे वळतील आणि उपग्रह टाळतील. ऑडियोवर उडाण आणि अंतरिक्षयानाच्या उतरण्याच्या आवाजाने, तसेच कप्तान आणि त्याचा सहायक रोबोट यांच्या रोजच्या नाटिकेने मुलांची कल्पना जागृत होईल.

दररोज तुम्ही मुलांस चंद्रावर, किंवा ताऱ्यांवर, अथवा दुसऱ्या ग्रहावरील अंतरिक्ष स्थानकास प्रवासास न्याल, जेथे त्यांस मोशेच्या जीवनातून देवाच्या थोरवीविषयी शिकावयास मिळेल. प्रत्येकास सोबत गीत गाणे आवडेल, गीतांसोबत अभिनयाची जोड दिली जाईल.

“पुलावरील” वेळ घालविण्यानंतर, मुले आपल्या वयोगटानुसार वर्गात जातील आणि संपूर्ण अंतरिक्षयानात आळीपाळीने फिरतील. ते नाविक वर्गास जातील, जेथे ते विद्यार्थ्यांच्या पुस्तकात काम करतील आणि पाठाची उजळणी करतील, जहाजावर इंजीनियरचे काम करतील, आणि न्याहारीसाठी भोजनालयात जातील आणि पाठात अंतरिक्ष अनुप्रयोग करतील. या लहान गटांत, तुमचे विद्यार्थी एकमेकांशी आणि त्यांच्या शिक्षकांशी ओळख करतील, संपूर्ण वर्षभर चालणारी नवीन मैत्री करतील.

काही मजेदार अंतरिक्ष खेळांसाठी पुन्हा मुलांना “पुलावर” बोलाविणे सोपे आहे. “गॅलेक्सी एक्सप्रेस” नावाच्या नवीन सीडी मधून काही गीते घेऊन आणि प्रार्थनेने दिवस समाप्त करावा. मुलांना दुसऱ्या दिवशी व्ही बी एस साठी पुन्हा निमंत्रण देण्यास विसरू नका!

मला आशा आहे की तुम्हाला हया अवकाशकालीन बायबल शाळेत आनंद येईल... मला माहीत आहे की तुम्ही यात आणखी कल्पकतेची भर घालाल आणि त्यास “या जगावेगळे” (अत्यंत मनोरंजक) बनवाल!

सामुग्री

विनामूल्य डाऊनलोड करा!

रिसोर्स पानावर आमच्याजवळ काय उपलब्ध आहे ते येऊन पाहा... आणि त्याचवेळी पुस्तके आणि इतर सामुग्री तुमच्या व्ही बी एससाठी विनामूल्य डाऊनलोड करा!

आणखी पाहा

लोगेज

तुमचे सण्डेस्कूल उठून दिसावे म्हणून ही विनामूल्य साधने शोधून पाहा!

आपला वर्ग अथवा वर्गाचा काही भाग हया हस्तकार्याने उठून दिसावा म्हणून थोडा प्रयत्न करा.

आणखी पाहा

हस्तकार्य

मुलांना हस्तकार्य आवडते!

हस्तकार्य वर्गास आणखी मजेदार बनवी. तुम्ही कोणत्याही देशाचे का असेना, हया कल्पना करावयास सोप्या आहेत.
विनामूल्य नमूने डाऊनलोड करा आणि हस्तकार्य सुरू करा!

आणखी पाहा