घरातले चॅम्पियन्स

प्रिय शिक्षक,
आम्ही देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देवो अशी प्रार्थना करतो कारण तुम्ही त्याची सेवा करता आणि जगभरातील मुलांची काळजी घेता. आपण बदल घडवून आणत आहात, आणि अनंतकाळासाठी आयुष्यात बदल घडवत आहात! आम्ही आपल्याला आश्चर्यचकित करणार आहोत. आपण विचार करत असाल कि आपण संडे स्कूल शिक्षक बनण्यासाठी साइन अप केले होते पण, आपण आता एक प्रशिक्षक आहात! ते बरोबर आहे, या वर्षी आपण एका बॉक्सिंग थीम सह बायबलचा अभ्यास करणार आहोत आणि खेळासोबत आपल्याला मजा येईल अशी आशा करतो. प्रिय शिक्षक, लगेच सुरुवात करा! शिक्षकाऐवजी एक प्रशिक्षक बना, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीची सखोल काळजी घेऊ शकता, आणि चॅम्पियन बनण्यासाठी त्यांची प्रगती व प्रयत्नांची पराकाष्ठा पाहू शकता.

आपण फ्रूट ऑफ़ द स्पिरिटचा अभ्यास करणार आहोत. मात्र, केवळ फ्रूट(फळ) न बघता, तर शरीराचे अनेक पाप सुद्धा पाहणार आहोत जे आपल्या फ्रूट ऑफ़ द स्पिरिट विरुद्ध लढतात. आपले ध्येय आपल्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन्स होण्यास मदत करणे आहे. हे करण्यासाठी, त्यांनी फक्त स्मृती अध्याय लक्षात ठेवणे आणि बायबल कथा पाठ करणे आवश्यक नाही तर, त्यांच्या दैनंदिन जीवनातील कृती मध्ये देखील फ्रूट ऑफ़ द स्पिरिट लागू करणे आवश्यक आहे. प्रशिक्षक म्हणून हे तुमच्यासाठी एक खूपच कठिण आव्हान आहे.

आपण कल्पना करू की बॉक्सिंग थीम वापरून, आपले विद्यार्थी संडे स्कूल वर्गात असतात तेव्हा ते प्रशिक्षण घेत आहेत. ते व्यायाम करत आहेत, देवाबद्दल अधिक जाणून घेत आहेत आणि पापा विरुद्ध कसे लढायचे हे शिकत आहेत. म्हणूनच आपले चर्च, प्रशिक्षण केंद्र आहे.

आपले विद्यार्थी जगात बाहेर असताना, ते प्रत्यक्षात "रिंग मध्ये!" असतात. येथेच खरंतर ते त्यांच्या स्वत:च्या पापी वासनांशी लढणार आहेत. म्हणूनच, त्यांची घरे आणि शाळा, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष स्पर्धा आणि बॉक्सिंग सामने आहेत. याचे कारण, चर्चमधे, आपण सगळेजण बरोबर उत्तरे देण्यात आणि चांगले असल्याचा आव आणण्यात माहिर आहोत. कृपया कोणत्याही मुलाला असा विचार नका करू देऊ की त्याने चर्चमधल्या पाठांतर किंवा शिकवाणीमुळे सामना जिंकला आहे. हे प्रशिक्षण आहे. वास्तविक लढाई त्यांच्या जीवनात आहे. ते सामने जिंकू शकतात, जर त्यांनी आठवड्यातील धड्यांची अंमलबजावणी केली तर.

प्रशिक्षक म्हणून तुमचे अंतिम कार्य आहे त्यांना बक्षिस देणे आणि ते यशस्वी होतात तेव्हा त्यांना प्रोत्साहित करणे. त्यांना देण्यासाठी काही पुरस्कार तयार ठेवा. त्यांना एक मिठी द्या किंवा प्रोत्साहन म्हणून विशेष गर्जना अशी करा प्रत्येक "पंच (ठोसा) साठी," फेरी किंवा जिंकलेल्या सामन्यासाठी. तुम्ही ज्या वर्तनाला बक्षिस द्याल तेच वर्तन तुम्हाला मुलांकडून मिळेल कारण विद्यार्थी तुम्हाला, त्यांचे प्रशिक्षक यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात.

आम्ही आशा करतो की आपल्याला एक प्रशिक्षक म्हणून तयार व्हायला, क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणून तुमच्या वर्गाला सजवायला आवडेल, आणि तुम्ही काही मज़ेदार पुरस्कार समारंभ घेऊ शकता. फ्रूट ऑफ़ द स्पिरिट मुळे जगण्यातले यश मिळेल, जसे खेळात मिळते, त्यांना जे बाकीच्यापेक्षा अधिक परिश्रम घेऊ इच्छितात. तुम्ही कठोर परिश्रम घेऊन चॅम्पियन्स बनण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोतसाहित करू शकता. बाक़ी कोणी त्यांच्यावर जेव्हा विश्वास ठेवत नाहीत तेव्हा फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा, आणि देवाला त्यांच्या जीवनात चमत्कार करताना पहा!

आमचा प्रभु आपणास प्रेरणा देवो, जसे आपण फ्रूट ऑफ़ द स्पिरिटमधे आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आव्हान घेता. आम्ही प्रार्थना करतो की आपण संडे स्कूल शिक्षकांवर ठेवलेल्या सर्व मार्यादा तोडून, आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष प्रशिक्षक बनाल.

संसाधने

मोफत डाउनलोड करा!

आमच्या संसाधने पानावर काय उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी या … आणि त्याच वेळी, आपल्या संडे स्कूलसाठी मोफत पुस्तके आणि इतर संसाधने डाउनलोड करा!

पुढे वाचा

लोगो

आपली संडे स्कूल उठून दिसण्यासाठी ह्या मोफत टूल्स पहा!

ह्या कलाकृती वापरून आपला वर्ग किंवा परिसर उठून दिसण्यासाठी कष्ट घ्या.

पुढे वाचा

कलाकृती

मुलांना कलाकृती आवडतात!

कलाकृती नेहमी वर्ग अधिक मजेदार बनवतात. या कल्पना तुम्ही ज्या देशात असाल तेथून बनवण्यास सोप्या आहेत. फ्री नमुने डाउनलोड करा आणि कलाकृती बनवण्यास सुरूवात करा!

पुढे वाचा