The Bridge Logoनियोजन

सोपे व्ही बी एस

तुमच्या हातात असे व्ही बी एस आहे जे सरळ, योजना करावयस सोपे आहे. एक तारीख ठरवा, स्वयंसेवकांस गोळा करा, निमंत्रणाचे पोस्टर सर्वत्र टांगा, आणि तुम्ही पुढे जावयास तयार आहात!
कर्मचाऱ्यांची मोठी टीम असली की त्यात भाग घेणाऱ्या प्रत्येकास आणखी मजा येते, म्हणून आणखी लोकांस सहभागी करण्यासाठी आम्ही हे कार्य वेगवेगळया भूमिकांत विभागले आहे.

तुमच्या व्ही बी एसच्या कामाचा भार विभागून घेण्यासाठी येथे काही कल्पना दिलेल्या आहेत :
1 व्ही बी एस संचालक 1 संगीत गायक
मुख्य पाठासाठी 1 प्रचारक
नाटकासाठी 2 अभिनेते (कप्तान आणि रोबोट)
1 वर्ग संयोजक (विद्यार्थ्यांची पुस्तके आणि पाठांची उजळणी करण्याचे ठिकाण)
1 हस्तकार्य संयोजक
1 न्याहारी संयोजक
1 क्रीडा संयोजक
प्रत्येक लहान गटासाठी 6-10 पुढारी, तुमच्या व्ही बी एसमधील मुलांच्या संख्येच्या आधारे

नाटक/स्केचेसधमाका

दररोज कप्तान मुलांस आपल्या सहायक रोबोटच्या मदतीने गॅलेक्सी एक्स्प्रेस अंतरिक्ष यानात बसवून फिरावयास नेईल.
तुमचा कप्तान एक गंभीर माणूस आहे कारण तो जहाजासाठी जबाबदार आहे, तसेच तो हया आठवडयात आध्यात्मिक माहिती मिळविण्याच्या मुलांच्या योग्यतेसाठी जबाबदार आहे. तो सहायक रोबोटचा लोकांशी परिचय घडवून आणतो : ओेबडधोबड आणि कधी कधी चूक काम करणारा रोबोट. कधी कधी बोलतांना रोबोट बडबड करू लागतो, शब्दांऐवजी विचित्र आवाज काढू लागतो. त्याला चालण्यासाठी साध्यात नेहमी तेलाची गरज भासते.
रोबोट आणि कप्तान दररोज त्या दिवसाच्या मुख्य मुद्याचा जितक्यांदा मुले जे ऐकतील, त्यावेळी मुलांनी जी प्रतिक्रिया व्यक्त करावयाची आहे तिचा परिचय घडवून देतील. कप्तान अंतरिक्ष अनुप्रयोगाचाही परिचय करून देईल जे मुले आपल्या लहान गटात ऐकतील.
रोजचा व्ही बी एस सुरू करण्यासाठी नाटकाच्या कल्पनाही देण्यात आल्या आहेत, पण आपण दिवसाची समाप्ती देखील त्याने करू शकता, अथवा पात्रांस खेळात भाग घ्यावयास लावावा किंवा वर्गांस भेटी द्या. मुलांना कप्तानाशी आणि रोबोटशी ओळख करून घेणे आवडेल.

थेट क्रिया

रोज मुले त्या दिवसाचा वाक्यप्रयोग, आणि अभिनयानिशी प्रतिक्रिया शिकतील. ही क्रिया फार महत्वाची आहे, त्यामुळे तुमची मुले मुख्य उपदेशाच्या वेळी त्रासणार नाहीत, आणि त्यामुळे तुमचा व्ही बी एस वर्ग विशेष ठरेल. तुमच्या संपूर्ण व्ही बी एस मध्ये, जेव्हा कधी पुढारी त्या दिवसाच्या वाक्यप्रयोगाचा उल्लेख करील, तेव्हा विद्यार्थ्यांस त्याची प्रतिक्रिया आणि क्रिया माहीत असली पाहिजे. कप्तान आणि रोबोट यांच्यासोबतच्या नाटकात ते हे शिकतील, आणि तुम्ही बाकी दिवसात त्याचा उपयोग करू शकता.

Message Relay Galaxy Expressसंदेश प्रसारण

प्रकरण 1

नेते : “देवाचा धावा करा!”

विद्यार्थी: पाठ शिकत असतांना, विद्यार्थी जितक्यांदा ऐकतील, “देवाचा धावा करा” तितक्यांदा त्यांनी उत्तर दयावे, “प्रभु, माझी मदत कर!” आणि उडी मारून आपले हात देवाकडे उंचवावे.

Message Relay Galaxy Expressसंदेश प्रसारण

प्रकरण 2

नेते : “देवाला प्ऱत्त्यु़त्तर द्या!”

विद्यार्थी: “पाठ सुरू असतांना, जितक्यांदा प्रत्येक विद्यार्थी ऐकतात तितक्यांदा त्यांनी “होय, प्रभु! असे म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि आपले हात कानावर ठेवावे. “देवाला प्रत्त्युत्तर दया!” पुढे ते “मी येथे आहे” असे म्हणत शिपायाप्रमाणे आपले पाय आपटतील."

Message Relay Galaxy Expressसंदेश प्रसारण

प्रकरण 3

नेते : “देवाचे आज्ञापालन करा!”

विद्यार्थी: प्रकरण्याच्या वेळेस प्रत्येकवेळी सर्व विद्यार्थी देवाच्या आज्ञा मानाबद्‌ल ऐकत असते, जेव्हा ते उभे आणि चारही बाजु कदमताल करत आपली बैठक एकदुस-यासोबत बदलावी आणि सर्व विद्यार्थीचा प्रतिउत्तर असे असले पाहिजे ” मी सतत हालचाल केली पाहिजे”

Message Relay Galaxy Expressसंदेश प्रसारण

प्रकरण 4

नेते : “देवाची वाट पाहा!”

विद्यार्थी: प्रकरण शिकण्याच्या वेळेस प्रत्येक वेळी विद्यार्थि ऐकणार, परमेश्वराची प्रतीक्षा करा, जेव्हा विद्यार्थी उडी मारेल आणि बॉक्सिंग सारखे खेळेल तेव्हा विद्यार्थ्याने प्रतिउत्तर करून म्हटले पाहिजे ”मी तयार आहे”. आणि ”पण मला प्रतीक्षा करावी लागेल” असे बोलून त्यांनी त्यांचे हाथ एकत्र आणावे आणि खाली बसावे.

Message Relay Galaxy Expressसंदेश प्रसारण

प्रकरण 5

नेते : “देवाची उपासना करा!”

विद्यार्थी: प्रकरण्याच्या वेळेस प्रत्येकवेळी विद्यार्थी ऐकतील परमेश्वराची आराधना करा, विद्यार्थ्यांचे प्रतिउत्तर असे असले पाहिजे जेव्हा ते त्यांचे हाथ आकाशाकडे उंच करूण आणि इकडे - तिकडे लांटासारखे हलवुन म्हणतील “मी तुझी आराधना करतो“.

Gamesअवकाश खेळ

हया कार्यक्रमाचा खेळ खेळतांना सर्व मुले एका मोठया वर्तुळात बसतील आणि त्यांस अनेक टीममध्ये विभाजित केले जाईल. (तुम्ही दोन किंवा चार टीमा तयार करू शकता.) सर्वात सोपी मुलींविरुद्ध मुलांची टीम. प्रत्येक खेळासाठी, टीम काही स्वयंसेवकांस आपल्या टीमचे प्रतिनिधित्व करावयास पाठवील. इतर स्वयंसेवक ओरडून, प्रोत्साहन देऊन, आपल्या खुर्चीतून हसून त्यांची मदत करतील, म्हणजे मुले त्रासणार नाहीत, तर प्रत्येक दिवशी थोडया वेळेसाठी कित्येक खेळ खेळतील. स्वयंसेवक सहभाग्यांस बदलले जाईल.
खेळात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एक विचार हा आहे की तुमच्या व्ही बी एसच्या इतर कार्यक्रमांत चांगले वर्तन करणाऱ्या मुलांचा शोध घ्यावा. हया विद्यार्थ्यांस असे काही द्या ज्यामुळे त्यांस खेळावयास मिळेल. हे त्यांच्या गळयाभोवती लटकविण्यासारखे, अथवा त्यांच्या मनगटात बांधण्यासारखे काही असेल, अथवा खिश्यात ठेवण्याचे कार्ड असू शकते.
(गॅलेक्सी एक्सप्रेस सी डी वर आम्ही खेळाच्या वेळेसाठी गीत दिले आहे.) तुमच्या व्ही बी एसच्या आनंदात भर घालतील अशा स्वस्त गोष्टी करा. तयार व्हा आणि मौज करा! प्रत्येक खेळासाठी तुम्ही आधीपासून तयारी केलेली बरी, त्यामुळे खेळ आणखी चांगला रंगेल. हे खेळ तयार करतांना ‘गेम शो’ आणि ‘निकेल ओडिऑन’ हया टी व्ही शोचा विचार करा. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी पुढे लावण्यासाठी एखादे भडक रंगाचे कापड आणू शकता, ध्वनी किंवा संगीत, आणि मजेदार सजवाट यांची देखील खेळाच्या वेळेसाठी तयारी करता येईल.

कार्यक्रमकार्यक्रम

(अडीच तासांचा कार्यक्रम)
पुल मोठा गट (50 मिनिटे)

  • गीत (20 मिनिटे)
  • नाटक (10 मिनिटे)
  • मुख्य पाठ आणि मुखपाठ वचन (20 मिनिटे)

रोटेशन स्थानक - छोटा गट (1 तासांचा )

  • भोजनालय - (न्याहारीचे ठिकाण आणि अंतरिक्ष अनुप्रयोग) (20 मिनिटे)
  • इंजीनियरिंग - हस्तकार्याचे ठिकाण (20 मिनिटे)
  • नाविक वर्ग (20 मिनिटे)

खेळ (30 मिनिटे)

समाप्तीचे गीत (10 मिनिटे)

रोटेशन स्थानक

प्रत्येक दिवसाच्या मधल्या वेळी मुलांस तीन गटात विभाजित करा अणि स्थानकातून आळीपाळीने फिरवा : भोजनालय हॉ (न्याहारी आणि अंतरिक्ष अनुप्रयोग), इंजीनियरिंग (हस्तकार्य) आणि कॅडेट विभाग (विद्यार्थ्यांची पुस्तके आणि पाठाची उजळणी). पुढल्या पानावर या स्टेशनविषयी आणखी वाचा.

न्याहारी स्थानक भोजनालय

न्याहारी स्थानक

येथे न्याहारी कशी तयार करावी याविषयी तुम्हाला सूचना मिळतील. हे लक्षात ठेवा की न्याहारी करण्यापूर्वी हस्तकार्याप्रमाणेच मुलांना न्याहारी तयार करण्यात आनंद येईल. नंतर स्वतः स्वच्छता करण्यास त्यांना शिकविण्याची संधी गमावू नका.

फॅक्टॉईडफॅक्टॉईड (न्याहारीच्या वेळी चर्चा करावयाचा अंतरिक्ष अनुप्रयोग)
न्याहारीच्या वेळी मुलांशी अंतरिक्ष अनुप्रयोगाविषयी आणि तो पाठाशी व त्यांच्या रोजच्या जीवनाशी कसा संबंधित आहे याची चर्चा करा. न्याहारी आणि अंतरिक्ष अनुप्रयोगयाविषयीची माहिती देखील भोजनालय पुढाऱ्याच्या पत्रकात आढळेल.

हस्तकला स्थानकइंजीनियरिंग

हस्तकला स्थानक

येथे तुम्हाला हस्तकार्याची कल्पना लाभेल, सोबतच काही वस्तू सूचविण्यात आलेल्या आहेत आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. गॅलेक्सी एक्स्प्रेस व्ही बी एस कार्यक्रमातील सर्व हस्तकार्य अशाप्रकारे तयार करण्यात आलेले आहेत की त्यात केवळ एका हस्तकार्यासाठी फक्त एक कागद लागेल, शक्यतो साहित्य किफायतशीर ठेवण्यात आले आहे. ऑनलाईनवर दिलेले नमूने डाऊनलोड करा, आणि संचालकाची हस्तपुस्तिका आणि इंजीनियरिंग नेत्याच्या पत्रकात हस्तकार्याची माहिती शोधून काढा. तसेच इंजीनियरिंग नेत्याच्या पत्रकात प्रति काढण्यासाठी नमूने शोधून काढा.

नाविक वर्ग नाविक वर्ग

विद्यार्थ्याचे पुस्तक आणि उजळणी स्थानक

येथे तुम्हाला चिन्ह भाषेतील बायबल गोष्टीतील काही मुख्य शब्दांविषयी सूचना मिळतील. गोष्टीची उजळणी करा, चिन्ह भाषेतील हे शब्द शिकवा. मग विद्यार्थ्याचे पुस्तक वाटा आणि कोणास तरी कुटप्रश्न सोडविण्यात मदत करा. ही माहिती सुद्धा कॅडेट वर्गाच्या पुढाऱ्याच्या पत्रकात आहे.

उदाहरण: कुटुंब
आंगठयाच्या आणि बोटाच्या मदतीने एक असे मोठे वर्तुळ तयार करा जेणेकरून तुमचे हातही टेकले जातील.
Family in Sign Language