इन द रिंग

तुमचे विद्यार्थी बाहेरच्या जगात गेल्यावर, ते प्रत्यक्षात , “इन द रिंग” असतात! येथेच खरंतर ते त्यांच्या स्वत: च्या पापी वासनांशी लढणार आहेत. त्यांची घरे आणि शाळा, म्हणूनच, प्रत्यक्ष स्पर्धा आणि बॉक्सिंग सामने आहेत. याचे कारण, चर्चमधे, आपण सगळेजण बरोबर उत्तरे देण्यात आणि चांगले असल्याचा आव आणण्यात माहिर आहोत. कृपया कोणत्याही मुलाला असा विचार नका करू देऊ नका की त्याने चर्चमधल्या पाठांतर किंवा शिकवाणीमुळे सामना जिंकला आहे. हे प्रशिक्षण आहे. वास्तविक लढाई त्यांच्या जीवनात आहे. ते सामने जिंकू शकतात, जर त्यांनी आठवड्यातील धड्यांची अंमलबजावणी केली तर.

दर आठवड्याच्या असाइनमेंट्स

गेल्या आठवड्यातील गृहपाठ असाइनमेंट्स वर चर्चा करा, आपल्या विद्यार्थ्यांना पुढच्या आठवड्यातील असाइनमेंट द्या. ते विद्यार्थी पुस्तकांमध्ये आहेत आणि सामना कार्ड वर. आपल्या विद्यार्थ्यांना आठवण करून द्या की फक्त जे असाइनमेंट करतात तेच चॅम्पियन्स होऊ शकतात. आपल्यापैकी कोणीही चर्च मध्ये उपस्थित राहिल्याने किंवा बायबल पाठ केल्याने एक चॅम्पियन् होऊ शकत नाही, पण ते जगल्याने! आम्ही शिफारस करतो की तुम्ही प्रशिक्षकांसह लहान गट बनावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या असाइनमेंट चा मागोवा ठेवण्यात मदत करण्यासाठी. (लहान गट / प्रशिक्षण विभागात अधिक पहा.)
आठवड्यातून एकदा गृहपाठ असाइनमेंट केल्याने नक्कीच ते पाप “नॉक आउट” होणार नाही, जसे फक्त एक पंच (ठोसा) बॉक्सिंगमधे विरोधकाला “नॉक आउट” करू शकत नाही. या बाबतीतले साम्य तुम्हाला विद्यार्थ्यांना दर्शविण्यासाठी उपयुक्त आहे की त्यांना प्रत्यक्षात चॅम्पियन् बनायचे असल्यास, त्यांना आठवड्यातभरात "अधिक पंच मारणे" आवश्यक आहे. प्रशिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी आठवड्यातभरात किती "पंच" मारले याचा मागोवा ठेवायला आणि स्पर्धा वाढवायला प्रोत्साहन द्यायला सांगा. प्रत्येक "पंच" ही एक घटना असेल जेव्हा त्यांनी त्या आठवड्यातील असाइनमेंट केली असेल. पंचेस ला अधिक मजेदार बनविण्यासाठी, या चार वेगवेगळ्या प्रकारच्या पंचेस चा वापर करा: जब, हुक, क्रॉस आणि अपरकट.  

सामना कार्ड

उपस्थिती बक्षीस द्या, या आठवड्याचा सामना असणारे एक कार्ड. पूर्ण वर्षभर नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना प्रोतसाहित करा, आणि सगळे कार्ड गोळा करा! हे कार्ड डाउनलोड आणि प्रिंट करण्यासाठी अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत. तुम्ही मेमरी खेळ खेळण्यासाठी हे कार्ड वापरू शकता, प्रत्येक असाइनमेंट एका पापशी जुळवून.

 

खेळ कार्ड 2
खेळ कार्ड 2 - लवकरच येत आहे!

Only available as a download.

मुलांना प्रत्येक आठवड्यात हे खेळ कार्ड गोळा करायला आवडतील! प्रत्येक कार्डच्या मागील बाजूस गृहपाठ दिलेला आहे

 

खेळ कार्ड 3
खेळ कार्ड 3 - लवकरच येत आहे!

Only available as a download.

मुलांना प्रत्येक आठवड्यात हे खेळ कार्ड गोळा करायला आवडतील! प्रत्येक कार्डच्या मागील बाजूस गृहपाठ दिलेला आहे